Breaking News

ENGvPAK: इंग्लंडने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, टी20 वर्ल्डकपआधी बटलरची बॉसगिरी सुरू

engvpak
Photo Courtesy: X/ICC

टी20 विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान (ENGvPAK) यांच्या दरम्यानच्या 4 टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. पहिला सामना पावसामुळे धुवून गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात तुफानी अर्धशतक करणारा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) सामनावीर ठरला.

लीड्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता.‌ या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडसाठी बऱ्याच कालावधीनंतर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने पुनरागमन केले.

फिल सॉल्ट लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार बटलर व विल जॅक्स यांनी अवघ्या सात षटकात 70 धावा चोपल्या. जॅक्स याने 37 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूने बटलर याने केवळ 51 चेंडूंमध्ये 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 84 धावा ठोकल्या. बेअरस्टोने 21 व आर्चरने 12 धावा करत संघाला 183 पर्यंत पोहोचवले. पाकिस्तानसाठी शाहिन आफ्रिदी याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

पाकिस्तानने या धावांचा पाठलाग करताना अत्यंत खराब सुरुवात केली. त्यांचे दोन्ही सलामीवीर रिझवान 0 व आयुब 2 स्वस्तात परतले. त्यानंतर बाबर (35) व फखर जमान‌ (42) यांनी 53 धावांची भागीदारी केली. इफ्तिकार (23) आणि इमाद (22) यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे त्यांना 23 धावांनी पराभूत व्हावे लागले.‌ इंग्लंडसाठी टोप्ली याने तीन तर मोईन व आर्चर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

(ENGvPAK England Beat Pakisthan By 23 Runs Buttler Shines)

 

5 comments

  1. I conceive you have mentioned some very interesting points, regards for the post.

  2. Real good visual appeal on this web site, I’d rate it 10 10.

  3. It’s actually a cool and helpful piece of information. I am glad that you shared this helpful info with us. Please keep us up to date like this. Thanks for sharing.

  4. I reckon something genuinely special in this site.

  5. I like the helpful info you provide in your articles. I will bookmark your weblog and check again here frequently. I am quite certain I’ll learn many new stuff right here! Good luck for the next!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *