![Narendra Modi](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/narendra-modi.jpg)
Kevin Pietersen Congratulate Narendra Modi|भारतात नुकतीच 2024 लोकसभा निवडणूक (2024 Loksabha Election) समाप्त झाली. चार जून रोजी जवळपास दोन महिने चाललेल्या या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपप्रणित एनडीएने (BJP Leading NDA) बहुमत मिळवले. शुक्रवारी (7 जून) एनडीएच्या बैठकीत माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा एकदा नेतेपद बहाल केले. यामुळे ते आता पुन्हा भारताचे पंतप्रधान बनू शकतात. त्यांना यासाठी जगभरातून शुभेच्छा मिळत असताना, इंग्लंडचा माजी कर्णधार व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामाचे नेहमी कौतुक करणारा केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारत का नेतृत्व करने के लिए एक और कार्यकाल हासिल करने के लिए @narendramodi को बहुत-बहुत बधाई। मैं जब भी भारत आता हूँ, देश बेहतर से बेहतर होता जाता है। क्या शानदार काम है, सर!
शुभकामनाएँ और ढेर सारा प्यार.
KP pic.twitter.com/Qk5UcAtP0J— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 7, 2024
लोकसभा निवडणुकीत एनडीएने 290 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी संसदीय नेता म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची निवड केल्याने ते तिसऱ्यांना भारताचे पंतप्रधान होतील. त्यांना आणखी एक संधी मिळणार असल्याने पीटरसन याने ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे त्याने हे ट्विट हिंदीमध्ये केले.
पीटरसनने लिहिले,
‘भारताचे नेतृत्व करण्यासाठी आणखी एक कार्यकाळ मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. जेव्हा जेव्हा मी भारतात येत आहे तेव्हा तेव्हा देश आणखीनच उत्तम होत आहे. तुम्ही खूप शानदार काम करत आहे. तुम्हाला शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम!’
पीटरसन यापूर्वी देखील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक करताना दिसला आहे. त्यांच्या अनेक कामांचे तो पोस्ट करत असतो. तसेच, नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली आहे.
(Kevin Pietersen Congratulate Narendra Modi)
आता चढला T20 World Cup 2024 ला रंग! छोट्या संघांची मोठी उडी, पाहा Point Tables