![RISHABH PANT AAP KI ADALAT](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/RISHABH-PANT-AAP-KI-ADALAT.jpg)
Rishabh Pant Aap Ki Adalat|भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय क्रिकेट संघासह (Indian Cricket Team) टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. त्याचवेळी त्याची एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
वरिष्ठ भारतीय पत्रकार रजत शर्मा यांच्या आप की अदालत (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात नुकतीच रिषभ याने मुलाखत दिली त्यावेळी त्याने आपल्या सुरुवातीपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काही माहीत नसलेल्या गोष्टी देखील मनमोकळेपणाने सांगितल्या. एमएस धोनी याच्यासोबत तुझे नाते कसे आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना तो भरभरून बोलला. तो म्हणाला,
“माही भाई माझा आदर्श आहे. त्याच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. ज्यावेळी मला मदतीची गरज असते त्यावेळी मी त्याच्याकडे जातो. तो नेहमीच माझी मदत करण्यासाठी तत्पर असतो. ”
तो पुढे म्हणाला,
“माझ्या मनात त्याच्याबद्दल नितांत आदर आहे. तो खेळाचा सर्वात महान खेळाडू आहे. मात्र, त्याच्यासोबत असल्यावर तुम्हाला ही गोष्ट तो जाणवू देत नाही. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर इतके प्रेम करतात.”
एमएस धोनी याने भारतीय संघासाठी 16 वर्षांपेक्षा जास्त काळ आपले योगदान दिले. रिषभ पंत याला त्याचा उत्तराधिकारी समजले जाते. मागील वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंत याचा गंभीर अपघात झाला होता. तब्बल दीड वर्ष त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी गेले. त्यानंतर आता त्याने पुनरागमन केले आहे. टी20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात नाबाद खेळी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.
(Rishabh Pant Aap Ki Adalat Speaks About MS Dhoni)