![T20 WORLD CUP 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/PAK.jpg)
T20 World Cup 2024 Match Fixing|
टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. त्यानंतर आता सुपर 8 (Super 8) सामने सुरू होण्याआधी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी (आयसीसी) युगांडा क्रिकेट संघाच्या (Uganda Cricket Team) एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत (Match Fixing) संपर्क झाल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील काही वर्षांपासून आयसीसीने मॅच फिक्सिंगबाबतचे नियम अत्यंत कडक केले आहेत. मात्र, असे असले तरी काही बुकी किंवा सट्टेबाज हे खेळाडूंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात युगांडा क्रिकेट संघाच्या एका खेळाडूशी केनियाच्या माजी क्रिकेटपटूने संपर्क केला. विविध नंबर वरून त्याने या खेळाडूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्या खेळाडूने लगेच आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याला याबाबतची माहिती दिली.
Match Fixing approaches
A former Kenya player attempted to approach the Ugandan team member multiple times using different phone numbers during the league stage matches in Guyana.
The Ugandan player reported these approaches to the ICC's Anti Corruption Unit (ACU). [PTI] pic.twitter.com/iZsBbHoFLn
— Don Cricket 🏏 (@doncricket_) June 18, 2024
आयसीसीने या प्रकरणाची वेळीच माहिती दिल्याने युगांडाच्या खेळाडूचे कौतुक केले आहे. तसेच सर्व संघांना केनियाच्या त्या माजी खेळाडूपासून सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. लवकरच त्या खेळाडूवर कारवाईत देखील करण्यात येईल, असे आयसीसी सूत्रांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकवेळा मॅच फिक्सिंग तसेच स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात समावेश दिसून येतो. सन 2010 मध्ये पाकिस्तानचे मोहम्मद आमीर, सलमान बट व मोहम्मद आसिफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कारवाई केली गेलेली. तसेच 90 च्या दशकात भारत, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानच्या अनेक मोठ्या खेळाडूंची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. अलीकडच्या काळात 2013 मध्ये आयपीएलमध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडीला यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कारवाई केली गेली होती.
(T20 World Cup 2024 Match Fixing Probability Uganda Player Involved)
‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा…’, चाहत्याच्या अंगावर धावून गेला पाकिस्तानी गोलंदाज; Video Viral