Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील प्रसंग घडला, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा रिषभवर रागावलेला दिसला. नेमके काय घडले?, पाहूया…
त्याचे झाले असे की, कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८१ धावा केल्या. अफगाणिस्तान संघ त्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा पॉवर प्लेमध्येच भारताने ३ विकेट गमावल्या. यानंतर गुलबदिन नायबसह अजमतुल्ला उमरझाईने डाव सांभाळला. त्यानंतर ११व्या षटकात वेगाने धावा काढण्याच्या प्रयत्नात नायबने कुलदीप यादवचा चेंडू हवेत मारला आणि पंतने १८ मीटर धावत जाऊन चेंडू पकडला. पण झेल घेतल्यानंतर जेव्हा पंतला रोहितसोबत सेलिब्रेशन करायचे होते तेव्हा त्याने रागाने नकार दिला.
खरंतर हा झेल रोहितच्या टप्प्यात होता, तो तिथे आधीच उभा होता, पण पंतने हाक मारल्यावर तो थांबला आणि त्याने झेल घेतला नाही. झेल पूर्ण झाल्यानंतर त्याने पंतला मजेत त्याच्या चुकीबद्दल खडसावले. दोघांमधील मजेशीर प्रसंग कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान पंत टी२० विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. बॅटने धावा करण्यासोबतच त्याने अप्रतिम यष्टिरक्षणही केले आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धही तीन झेल घेतले आणि आता या स्पर्धेत त्याचे एकूण १० झेल झाले आहेत. यासोबतच त्याने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तो टी२० विश्वचषकात यष्टीमागे सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी हा विक्रम ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू वेड, जोस बटलर, स्कॉट एडवर्ड्स आणि दासुन शनाका यांच्या नावावर होता. या सर्वांनी प्रत्येकी ९ झेल घेतले.