![t20 world cup 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/chris-jordan.jpg)
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा 10 वा सामना गतविजेता इंग्लंड विरुद्ध युएसए (ENG vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ दाखवत यूएसएला केवळ 115 धावांवर सर्वबाद केले. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने हॅट्रिक घेत इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. इंग्लंडसाठी टी20 विश्वचषकात हॅट्रिक (Chris Jordan Hat-trick) घेणारा तो पहिलाच गोलंदाज बनला.
इंग्लंडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी युएसएच्या फलंदाजांचे नियमित अंतराने बळी मिळवले. नितीश कुमार याने सर्वाधिक 30 धावा केल्या. तळातील फलंदाजांनी पूर्णतः हाराकिरी केल्याने संघ धावसंख्या वाढविण्यात अपयशी ठरला. अठराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हरमीत सिंग सहाव्या गड्याच्या रुपात बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या 6 बाद 115 होती.
A sensational HAT-TRICK 💥
Chris Jordan nips out three USA batters in three deliveries and brings up his @MyIndusIndBank Milestone moment 👏#T20WorldCup | #USAvENG | 📝: https://t.co/wNQ1pl3vcI pic.twitter.com/DRotMYtaLG
— ICC (@ICC) June 23, 2024
यानंतर ख्रिस जॉर्डन हा गोलंदाजीसाठी आला. त्याने 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कोरी ऍंडरसन याला ब्रुक याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर अली खान, चौथ्या चेंडूवर केन्जिगे व पाचव्या चेंडूवर सौरभ नेत्रावळकर याला बाद करत, हॅट्रिक पूर्ण केली. एकाच षटकात चार बळी घेत युएसएचा डाव संपवला.
यासह इंग्लंडसाठी टी20 क्रिकेट व टी20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तसेच, हे त्याचे होम ग्राउंड देखील आहे. जॉर्डन याचा जन्म बार्बाडोस येथीलच आहे.
(Chris Jordan Took Hat-trick In T20 World Cup 2024)