Breaking News

टीम इंडियाने पुन्हा उडवला पाकिस्तानचा धुव्वा! Womens Asia Cup मध्ये ‘हरमन’सेनेची विजयी सलामी

womens asia cup
Photo Courtesy: X/BCCI Womens

Womens Asia Cup: बांगलादेश येथे सुरू झालेल्या महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धेत शुक्रवारी (19 जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDW vs PAKW) असा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सलामीवीरांच्या कामगिरीमुळे भारताने हा विजय साकार केला.

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी तिचा हा निर्णय चुकीचा ठरवला. सुरुवातीलाच रेणुका ठाकूर व पुजा‌ वस्त्राकर यांनी पाकिस्तानला चार धक्के दिले. त्यानंतर फिरकीपटू दीप्ती शर्मा व श्रेयंका पाटील यांनी अनुक्रमे तीन व दोन बळी घेत पाकिस्तानचा डाव केवळ 108 धावांवर संपवला. पाकिस्तानसाठी अमीन हिने सर्वाधिक 25 धावा बनवल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला स्मृती मंधाना (Smriti Mandhana) व शफाली वर्मा (shafali Verma) यांनी 9.3 षटकातच 85 धावांची सलामी दिली. दोघींनी अनुक्रमे 40 व 45 धावा बनवल्या. त्यानंतर आलेली हेमलता 14 धावा करू शकली. अखेर हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी आणखी पडझड न होऊ देता संघाचा विजय साकार केला. तीन बळी मिळवणाऱ्या दीप्ती शर्मा हिला सामनावीर पुरस्कार दिला गेला.

(India Beat Pakistan In Womens Asia Cup Deepti Shafali Shine)

संघ विकणे आहे! IPL 2025 आधी या संघाला मिळणार नवा मालक, किंमत थेट अब्जांमध्ये