Breaking News

Manu Bhaker Coach: कोण आहे मनू भाकेरचे कोच? का होतेय त्यांची तुफान चर्चा? नक्की वाचाच

MANU BHAKER COACH
Photo Courtesy: X

Olympics Medalist Manu Bhaker Coach Jaspal Rana: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये दुसऱ्या दिवशी भारताला आपले दुसरे पदक मिळाले. नेमबाज मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्य पदक (Manu Bhaker Bronze Medal) आपल्या नावे करत, भारताच्या पदकाचे खाते खोलले. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्ष होत असतानाच, तिच्या प्रशिक्षकांची देखील चर्चा होताना दिसतेय. मात्र, हे प्रशिक्षक नक्की आहेत तरी कोण? याविषयी आपण जाणून घेऊया.

मनू भाकेर हिच्या यशात सर्वात मोठा वाटा यांचा आहे, ते तिचे प्रशिक्षक आहेत भारताचे माजी नेमबाज व तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana). जसपाल राणा हे नाव भारतीय नेमबाजी फॉलो करणाऱ्या लोकांसाठी अगदीच नवे नाही. त्यांचे करिअर पाहिल्यावर, त्यांचे नाव भारताच्या महान खेळाडूंमध्ये का घेतले जाते हे समजून जाईल. भारतासाठी कॉमनवेल्थ इतिहासात सर्वाधिक पदके जिंकण्याचा कारनामा राणा यांनी केला आहे. यामध्ये तब्बल 9 गोल्ड, 4 सिल्वर आणि 2 ब्रॉंझ सामील आहेत.

(Manu Bhaker Coach Jaspal Rana)

एशियन गेम्समध्ये देखील 4 गोल्ड आणि प्रत्येकी दोन सिल्वर व ब्रॉंझ अशी आठ मेडल त्यांच्या कॅबिनेटमध्ये सजली आहेत. तसेच एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपही त्याने जिंकली आहे. इतका तगडा पोर्टफोलिओ असताना, राणा यांनी काही काळ राजकारणात देखील हात आजमावले. सध्या डेहराडून येथे ते स्वतःची वैयक्तिक शूटिंग अकॅडमी चालवतात.

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| भारतीय नेमबाजांकडून तीन मेडलवर निशाण्याची अपेक्षा, 12 वर्षांचा दुष्काळ यंदा संपणार?

राणा हे सुरुवातीपासूनच मनू भाकेरचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, टोकियो ऑलिंपिकच्या काही महिने आधी दोघांमध्ये टोकाचा वाद झाला व त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टोकियो ऑलिंपिक्समध्ये तीन प्रकारात सहभागी होऊनही मनू, एकाही प्रकारात फायनलपर्यंत पोहोचू शकली नव्हती. तिची कामगिरी यानंतर सातत्याने ढासळत गेली. अखेर, आधीचे सगळे वाद विसरून एशियन गेम्सपूर्वी राणा यांनी मनूचा वैयक्तिक प्रशिक्षक बनण्यास होकार दिला.

पुन्हा नव्याने मनूचे प्रशिक्षक बनल्यावर राणा यांनी तिला सर्वात प्रथम पिस्टल दुरुस्त करण्यास शिकवले. टोकियो ऑलिंपिक्समध्ये पिस्टल खराब झाल्यामुळे तिला स्पर्धा सोडावी लागली होती. दिवसातून केवळ दहा मिनिटे इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया वापरायला परवानगी दिली. नेमबाजीसारख्या खेळात जी मानसिक कठोरता हवी असते ती, मिळवून देण्यात राणा यशस्वी ठरले. त्याचाच परिणाम आज अडीच वर्षानंतर मनू भाकेर ऑलिंपिक पोडियमवर पोहचली.

(Who Is Manu Bhaker Coach Jaspal Rana)

हे देखील वाचा- शूटर मनू भाकेरचा ‘कांस्य’वेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताने उघडले मेडलचे खाते