Breaking News

Dawid Malan Retirement: इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय

dawid malan retirement
Photo Courtesy: X

Dawid Malan Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी निवड न झाल्याने त्याने हा निर्णय घेतला ते सांगितले जाते. सध्या 37 वर्षाचा असलेला मलान, मोठ्या कालावधीसाठी टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषकानंतर वनडे संघात मात्र त्याची निवड झाली नव्हती (Dawid Malan Retirement).

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे व टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये मलान याचा देखील समावेश होता.‌ तसेच, त्याच्या वयाचा विचार करता व वरच्या फळीतील युवा फलंदाजांची कामगिरी पाहता त्याला भविष्यात संधी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली.

मलान याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या तिशीनंतर संधी मिळाली. यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघांमध्ये आपली जागा बनवली. तो टी20 फलंदाजी क्रमवारीत मोठ्या कालावधीसाठी पहिल्या क्रमांकावर होता. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये त्याने वरच्या फळीत दमदार कामगिरी केली.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 22 कसोटी सामने खेळताना 1074 धावा बनवल्या. तर 30 वनडेत 55 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1450 धावा ठोकताना तब्बल 6 शतके व 7 अर्धशतके झळकावली. तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 62 सामन्यात 1892 धावा त्याच्या नावे जमा आहेत. इंग्लंडने जिंकलेल्या 2022 टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. यासोबतच तो जगभरात टी20 लीग क्रिकेट खेळताना दिसतो.

(Dawid Malan Retirement From International Cricket)

जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान