Breaking News

तिची जगण्याचीही नव्हती अपेक्षा, आज Paris Paralympic 2024 मध्ये जिंकली देशासाठी दोन मेडल, कोण आहे Preeti Pal?

preeti pal
Photo Courtesy: X

Story Of Preeti Pal Who Won Double Medal In Paris Paralympic 2024):

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये (Paris Paralympic 2024) भारतीय पॅरा खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. रविवारी (1 सप्टेंबर) रात्री भारताने आणखी एक पदक जिंकले. भारताची धावपटू प्रीती पाल (Preeti Pal) हिने महिलांच्या 200 मीटर T35 शर्यतीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पॅरालिंपिक आणि ऑलिंपिक या दोन्ही स्पर्धांमध्ये ट्रॅक प्रकारात दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

प्रीतीने 30.01 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह आपल्या शानदार खेळाच्या जोरावर ही कामगिरी केली. मात्र, ती झिया झाऊ (28.5 सेकंद) आणि गुओ कियानकियान (29.09 सेकंद) या चिनी जोडीच्या मागे राहिली. त्या दोघींनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.

याआधी शुक्रवारी प्रीतीने महिलांच्या 100 मीटर T35 शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. भारताच्या 23 वर्षीय प्रीतीने अंतिम फेरीत 14.21 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावलेले. विशेष म्हणजे त्यावेळी देखील याच चिनी जोडीने 100 मीटर प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले होते.

उत्तर प्रदेशमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रीतीला तिचा जन्म झाल्यापासूनच अनेक शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागले. तिच्या जन्मानंतर, तिच्या शरीराच्या खालच्या भागावर सहा दिवस प्लास्टर करण्यात आले होते. कमकुवत पाय आणि पायाचा आकार वेगळा असल्याने तिला जन्मापासूनच अनेक व्याधी असल्याचे स्पष्ट झालेले.

प्रीतीने तिचे पाय बळकट करण्यासाठी अनेक उपचार केले होते. वयाच्या पाचव्या वर्षी तिला कॅलिपर घालावे लागले आणि तिने ते आठ वर्षे वापरले. प्रीती जास्त दिवस जगेल, याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, तिने हार मानली नाही आणि पॅरालिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करत दोन कांस्यपदके जिंकली.

वयाच्या 17 व्या वर्षी सोशल मीडियावर पॅरालिंपिक खेळांच्या क्लिप पाहिल्यानंतर तिला पॅरा-स्पोर्ट्समध्ये रस निर्माण झाला. तिने ऍथलेटिक्सचा सराव सुरू केल्यानंतर काही वर्षांनी तिच्या मार्गदर्शक, पॅरालिंपियन फातिमा खातून यांच्याशी तिची भेट झाली. त्यांच्याच मार्गदर्शनात तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव कमावले.

(Story Of Preeti Pal Who Won Double Medal In Paris Paralympic 2024)

हे वाचलंत का?

Paris Paralympic 2024 मध्ये भारताचा शुभारंभ दोन मेडलने! अवनी लेखराच्या गोल्डसह मोना अगरवालचा ब्रॉंझवर निशाणा