IND v NZ: पुणे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पुढे 359 धावांचे लक्ष, तिसऱ्या दिवशीच सामना संपण्याच्या दिशेने

ind v nz
Photo Courtesy: X

IND v NZ Pune Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा सामना पुणे येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातच न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले. अडीच दिवसांपेक्षा जास्त कालावधी या सामन्यात शिल्लक असून, फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर टिकाव धरण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कच खाल्ल्याने न्यूझीलंडला 103 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर ती आघाडी वाढवत न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर 300 पार नेली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा याने आपल्या फिरकीचे जाळे विणले. त्याने तीन बळी घेत न्यूझीलंडचा दुसरा डाव 355 धावांवर संपवला.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथम याच्या शानदार अर्धशतकामुळे सामन्यात आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक चार बळी बाद केलेले.

(IND v NZ India Needed 359 For Win Pune Test)