
Karun Nair In VHT 2024-2025: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लिस्ट ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (18 जानेवारी) खेळला गेला. या स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाचा (Vidharbha Cricket Team) कर्णधार करूण नायर (Karun Nair) याची सुरू असलेली स्वप्नवत कामगिरी अखेर थांबली.
Karun Nair Stats In Vijay Hazare Trophy 2024-2025
विदर्भ विरुद्ध कर्नाटक यांच्यातील अंतिम सामन्यात कर्नाटक संघाने विदर्भापुढे 349 धावांचे आव्हान ठेवले. विदर्भ संघाचा कर्णधार करूण नायर हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आला. त्याने 31 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णाने त्याचा त्रिफळा उडवला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
करूण याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आठ सामने खेळताना 779 धावा केल्या. यामध्ये तो केवळ दोन वेळा बाद झाला. यामुळे त्याची सरासरी 389.5 इतकी शानदार राहिली. यामध्ये पाच शतकांचा समावेश होता. तर त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील आले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 123 पेक्षा जास्त राहिला.
नायर याच्याकडे या सामन्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या एका हंगामात सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचे संधी होती. या स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम तमिळनाडूच्या एन. जगदिसन याच्या नावे असून त्याने 2022-2023 च्या हंगामात तब्बल 830 धावा बनवल्या होत्या. तर, पृथ्वी शॉ याने 2020-2021 हंगामात 827 धावा ठोकलेल्या. मात्र, सरासरीच्या बाबतीत नायर या सर्वांच्या कित्येक पुढे आहे.
नायर याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतरही फेब्रुवारी-मार्च पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत व हार्दिक पंड्या हे खेळाडू असल्याने नायर याची संधी हुकल्याचे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटले. मात्र, एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास नायर याच्या नावाचा विचार केला जाईल असे देखील त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
(Karun Nair Stats In Vijay Hazare Trophy 2024-2025)
हे देखील वाचा- कामगिरी दमदार, तरीही Champions Trophy 2025 साठी या तिघांचा नाही झाला विचार
Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार सज्ज
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।