![BPL MATCH FIXING](https://kridacafe.com/wp-content/uploads/2025/02/BPL-MATCH-FIXING.jpg)
BPL Match Fixing: मागील काही दिवसांपासून बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहे. विदेशी खेळाडूंना रक्कम न दिल्याने अनेक विदेशी खेळाडूंनी चालू स्पर्धेतून माघार घेतली. तर, एका संघाने थेट आपले ऑफिशियल पेज बंद करून, खेळाडूंशी संपर्क साधणे बंद केले आहे. अशात आता याच स्पर्धेतून मॅच फिक्सिंग प्रकरणाची गंभीर बातमी समोर येतेय.
10 Players In BPL Match Fixing Scandal
बीपीएल 2025 स्पर्धेची अखेर जवळ आली असताना चालू हंगाम तसेच मागील काही हंगामातील काही सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याची शक्यता, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या समितीने वर्तवली आहे. यामध्ये तब्बल 10 खेळाडूंचा समावेश असू शकतो असे म्हटले जातेय. यापैकी सहा खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
आरोप होत असलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एक व वेस्ट इंडिजचे दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. तर, बांगलादेशच्या तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावे या यादीत दिसतायेत. याव्यतिरिक्त श्रीलंकेतील दोन व बांगलादेशमधील दोन देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. सोबतच स्पर्धेत खेळणाऱ्या 4 फ्रॅंचायजींकडे देखील याप्रकरणी बोर्ड दाखवले जातेय. तर, चालू हंगामातील नऊ सामन्यांची याप्रकरणी चौकशी होणार आहे.
(10 Players In BPL Match Fixing Scandal)
क्रिकेटचा मराठी इतिहासकार हरपला! जेष्ठ समीक्षक Dwarkanath Sanzgiri यांचे निधन, चाहत्यांमध्ये हळहळ