Breaking News

ग्रॅंडमास्टर Koneru Humpy ने रचला इतिहास! FIDE चेस वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिले भारतीय महिला

koneru humpy
Photo Courtesy: X

Koneru Humpy: भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिने प्रतिष्ठित FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू बनण्याचा मान तिने मिळवला.

Koneru Humpy In FIDE World Cup Semi Finals

चीनच्या सॉन्ग युक्सिन विरुद्धच्या क्वार्टरफायनल सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये बरोबरी साधून हंपीने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. हंपीने पहिला गेम जिंकला आणि स्वतःला सुस्थितीत नेले. त्यानंतर या भारतीय ग्रँडमास्टरने सावध दृष्टिकोनाचा पर्याय निवडला आणि अखेर युक्सिनने ड्रॉ खेळण्यास प्राधान्य दिल्याने, हंपीची ऐतिहासिक कामगिरी निश्चित झाली.

हंपी उपांत्य फेरीत लेई टिंगजीशी सामना करणार आहे. तर टॅन झोंगी दुसऱ्या सेमीफायनलसाठी भारताच्याच डी हरिका व दिव्या देशमुख (Divya Deshmukh) यांच्यातील टायब्रेकरच्या विजेत्याची वाट पाहत आहे. त्यामुळे या दोघींपैकी आणखी एक भारतीय उपांत्य फेरी खेळणी निश्चित असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Divya Deshmukh च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 19 व्या वर्षीच चेस वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी