
ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस समाप्त झाला. इंग्लंडने संपूर्ण दिवसावर हुकूमत गाजवत धावांची मोठी आघाडी मिळवली. अनुभवी जो रूट (Joe Root) याचे दीडशतक व कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे अर्धशतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights
– तिसऱ्या दिवशी इंग्लंडने केली 2 बाद 225 च्या पुढे सुरुवात
– ओली पोपने झळकावले मालिकेतील आणखी एक अर्धशतक
– जो रूटने कसोटी कारकिर्दीत 104 वेळा घातला 50 पेक्षा जास्त धावांचा टप्पा
– एकही बळी न गमावता पहिल्या सत्रात इंग्लंडने केल्या 107 धावा
– लंचपर्यंत इंग्लंड 2 बाद 332
– लंचनंतर लगेचच पोप 71 धावांवर बाद
– हॅरी ब्रूक केवळ 3 धावा काढून तंबूत, सुंदरने दोघांना केले बाद
– जो रूट व कर्णधार बेन स्टोक्सची जमली जोडी
– रूटने साजरे केले कसोटी कारकिर्दीतील 38 वे शतक
– वैयक्तिक 120 धावांवर पोहोचताच ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगला मागे टाकत कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला रूट
– चहापानापर्यंत इंग्लंड 4 बाद 443
– चहापानानंतर स्टोक्सच्या बॅटमधून आले अर्धशतक
– चेंडू लागल्याने स्टोक्स रिटायर्ड हर्ट
– जो रूट 150 धावा करून जडेजाचा झाला शिकार
– जेमी स्मिथ केवळ 9 धावांवर तंबूत, ख्रिस वोक्सने केल्या 4 धावा
– बेन स्टोक्स पुन्हा एकदा मैदानात दाखल
– दिवस संपेपर्यंत आणखी पडझड न होऊ देता स्टोक्स-डॉसन जोडीने केली 16 धावांची भागीदारी
– दिवसाचा खेळ समाप्त होताना इंग्लंड 7 बाद 544, स्टोक्स 77 तर डॉसन 21 धावांवर नाबाद
– इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।