Breaking News

Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर

asia cup 2025 schedule
Photo Courtesy: X

Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना देखील नियोजित करण्यात आला आहे.

Asia Cup 2025 Schedule

आठ संघांच्या या स्पर्धेत दोन गट केले गेले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, युएई व ओमान यांचा समावेश आहे. तर, ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश व हॉंगकॉंग भिडतील. स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग या सामन्याने होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना 14 सप्टेंबर रोजी होईल. यानंतर साखळी फेरीत गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये खेळतील. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पुन्हा रंगू शकतो. संपूर्ण स्पर्धा दुबई व अबुधाबी येथे खेळली जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होईल.

साखळी फेरी:

9 सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग

10 सप्टेंबर- भारत विरुद्ध युएई

11 सप्टेंबर- हॉंगकॉंग विरूद्ध बांगलादेश

12 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध ओमान

13 सप्टेंबर- बांगलादेश विरूद्ध श्रीलंका

14 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

15 सप्टेंबर- ओमान विरूद्ध युएई

15 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध हॉंगकॉंग

16 सप्टेंबर- बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान

17 सप्टेंबर- युएई विरूद्ध पाकिस्तान

18 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

19 सप्टेंबर- भारत विरुद्ध ओमान

सुपर 4:

20 सप्टेंबर बी 1 विरुद्ध बी 2

21 सप्टेंबर ए 1 विरुद्ध ए 2

23 सप्टेंबर ए 2 विरूद्ध बी 1

24 सप्टेंबर ए 1 विरुद्ध बी 2

25 सप्टेंबर ए 2 विरूद्ध बी 2

26 सप्टेंबर ए 1 विरुद्ध बी 1

फायनल

29 सप्टेंबर

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ