
Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby: प्रो कबड्डी लीग 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये गुरुवारी (18 सप्टेंबर) ‘महा डर्बी’चा सामना खेळला गेला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा (U Mumba) अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने 40-22 अशी सहज सरशी साधली. पुणे संघाच्या बचावपटूंनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली.
महाडर्बीचा मुकुट आज पुणेरी पलटनच्या शिरावर! 💪🔥#PKL12 #ProKabaddi #GhusKarMaarenge #UMumba #PuneriPaltan pic.twitter.com/Jig3b284Xi
— ProKabaddi (@ProKabaddi) September 18, 2025
Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby
जयपुर येथे होत असलेल्या दुसऱ्या लेगच्या या सामन्यात सर्वांना अटीतटीच्या लढतीत अपेक्षा होती. सांगण्याचा पहिला दहा मिनिटात दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच गुण कमावले. ऑल आऊटच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणेरी पलटनने त्यानंतर जबरदस्त खेळ दाखवला. त्यांनी तीन सुपर टॅकल करत पहिल्या हाफच्या अखेरीस 15-10 अशी आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे, कर्णधार अस्लम इनामदार याला एकही गुण मिळवता आला नव्हता.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून पुणेरी पलटणने आक्रमणाला धार आणत यु मुंबाला ऑल आऊट केले. हंगामातील आपला पहिला सामना खेळत असलेल्या स्टुअर्ट सिंग याने 7 रेडींग पॉईंट कमावले. गुरदीप याने बचावत हाय फाईव पूर्ण केला. त्याला अबिनेश व गौरव खत्री यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत साथ दिली. या विजयासह पुणेरी पलटणने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ