
No Handshake In PKL 12 Match: प्रो कबड्डी लीग 2025 चा बारावा हंगाम आता चांगलाच रंगू लागला आहे. सोमवारी (29 सप्टेंबर) याचाच एक अध्याय पहायला मिळाला. हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) विरुद्ध दबंग दिल्ली (Dabangg Delhi) अशा झालेल्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी मॅच रफ्री व विरुद्ध संघाशी सामन्यानंतर हात मिळवले नाहीत. या गोष्टीची क्रीडाजगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
No handshakes for today 😬 Just pure DRAMA 🔥#PKL12 #GhusKarMaarenge #DabangDelhiKC #HaryanaSteelers pic.twitter.com/UoCth7dIgF
— ProKabaddi (@ProKabaddi) September 29, 2025
No Handshake In PKL 12 By Haryana Steelers
सोमवारी झालेल्या हरियाणा विरुद्ध दिल्ली या शेजाऱ्यांच्या सामन्यामध्ये प्रचंड आक्रमक खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीला मोठी आघाडी घेतलेल्या दिल्लीला हरियाणाने शेवटच्या काही मिनिटांमध्ये हैराण केले. सामन्यातील अखेरची काही सेकंद शिल्लक असताना दिल्लीकडे 38-36 अशी आघाडी होती. मात्र, त्यांचे केवळ दोनच खेळाडू बाकी होते. हरियाणाचा रेडर शिवम पठारे याने रेड मारत एका खेळाडूला बाद केले. त्याने आपली रेड पूर्ण केली तेव्हा एक सेकंद शिल्लक असल्याचे स्पष्ट दिसत होते.
नियमानुसार व आधीच्या अनुभवाने उर्वरित एका सेकंदात दिल्लीला रेड करण्याची संधी मिळायला हवी होती. मात्र, मॅच रेफ्रींनी सामना त्याच ठिकाणी समाप्त होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे हरियाणा संघाला 38-37 असा पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे दिल्लीने आपल्या अव्वल स्थान भक्कम केले. तर, हरियाणाची दुसऱ्या क्रमांकावर जायची संधी हुकली.
या संपूर्ण प्रकरणामुळे हरियाणा स्टिलर्सचा मुख्य प्रशिक्षक मनप्रीत सिंग ( Manprit Singh) प्रचंड चिडलेला दिसला. त्याने विरोधी संघाचा मुख्य प्रशिक्षक जोगिंदर नरवाल याच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. आपल्या प्रशिक्षकाप्रमाणेच सर्व खेळाडूंनीही विरोधी संघ व मॅच रेफ्रींशी हात न मिळवता मैदान सोडले. कबड्डीच्या मैदानावर असा प्रकार प्रथमच झाल्याचा पाहायला मिळाला. याबाबत सोशल मीडियावर सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Pro Kabaddi लाही लागली फिक्सिंगची कीड? दिग्गजाचा मोठा दावा, “PKL 12 मध्ये…”
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।