Breaking News

MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा

MCA International cricket stadium
Photo Courtesy: X

IPL 2026 Matches At MCA International Cricket Stadium: आयपीएल 2026 साठी अद्याप जवळपास पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.‌ असे असले तरी, स्पर्धेची चर्चा आत्ताच सुरू झालेली दिसते. आयपीएल 2026 च्या रिटेन्शनआधी पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.‌ आयपीएल 2026 मध्ये पुण्याच्या एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काही सामने होऊ शकतात.

IPL 2026 Matches At MCA International Cricket Stadium

आयपीएल 2025 ची विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नव्या हंगामापूर्वी संघाला नवीन मालक मिळतील. असे असतानाच, आरसीबी आपले घरचे मैदान असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपले सामने खेळू शकणार नाही. बंगळुरू महानगरपालिका प्रशासनाने चिन्नास्वामी स्टेडियम हे मोठी गर्दी जमवण्यासाठी असुरक्षित असल्याचे म्हटलेले. त्यामुळे महिला वनडे विश्वचषकातील सामने देखील मुंबई येथे  हलवण्यात आलेले. त्यासोबतच, आता आयपीएल 2026 चे सामनेदेखील तिथे खेळले जाणार नाहीत, याची दाट शक्यता आहे.

अशा परिस्थितीत आरसीबी आपल्या नव्या होम ग्राऊंडचा शोध घेताना दिसतेय. सध्या येत असलेल्या वृत्तानुसार, आरसीबी संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती पुणे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. याव्यतिरिक्त नागपूरचे जामठास्थित व्हीसीए स्टेडियम याच्या देखील नावाची चर्चा समोर येतेय.

पुण्याजवळील गहुंजे येथे असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यापूर्वी पंजाब किंग्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रायझिंग पुणे सुपरजायंट्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचे घरचे मैदान राहिले आहे. याव्यतिरिक्त 2023 वनडे विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन देखील या मैदानावर करण्यात आलेले. जवळपास 40 हजार प्रेक्षक क्षमता असलेला या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा असलेल्या दिसून येतात.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?