
Ashes Series Story: क्रिकेटच्या मैदानावर रायवलरी नावाचा शब्द ज्या मालिकेला खऱ्या अर्थाने शोभतो ती मालिका म्हणजे ऍशेस मालिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या सर्वात पहिल्यांदा क्रिकेट खेळणाऱ्या दोन देशांतील द्वंद्व म्हणजे ऍशेस. हीच मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा जगभरातील क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. याच प्रतिष्ठित मालिकेचा खरा इतिहास आज आपण जाणून घेऊया.
How does a small urn hold such weight? ⚱
Born from a tease, it now stands for cricket’s oldest rivalry. 💪WATCH #AUSvENG 👉 THE ASHES | 1st Test | FRI, NOV 21, 7.50 AM pic.twitter.com/tdb0gvsM28
— Star Sports (@StarSportsIndia) November 20, 2025
Story Of Ashes Series It’s 143 Years Legacy
ज्या मालिकेची दर दोन वर्षांनी क्रिकेटजगत वाट पाहत असते त्या मालिकेच्या इतिहासाला सुरुवात झाली 1882 पासून. 1882 मध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 7 धावांनी पराभूत झाली. इंग्लंडमध्ये 1877 पासून खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा हा इंग्लंडमधील पहिलाच विजय होता. या गोष्टीची त्यावेळी जोरदार चर्चा झाली. इंग्लंडमधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘स्पोर्टींग टाईम’ ने त्यावेळी ऑगस्ट महिन्यात इंग्लंड क्रिकेट संघासाठी उपहासात्मक शोकसंदेश लिहिला. त्यात लिहिले, ‘the body will be cremated and the ashes taken to australia’ म्हणजेच ‘इंग्लंड क्रिकेटचा मृ’त्यू झाला असून, त्यावर अंतिम संस्कार होऊन राख ऑस्ट्रेलियात नेली जाईल’. इथूनच जन्म झाला ऍशेसचा.
चिथावणीखोर अथवा खिल्ली उडवणाऱ्या या शब्दांनी इंग्लंडचे कर्णधार इवो ब्लिग (Ivo Bligh) यांचा आत्मसन्मान दुखावला. त्यांनी ऍशेस पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये आणण्याची शपथ घेतली (To Regain The Ashes). यानंतर 1882-1883 सिरीजसाठी इंग्लंड ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. इंग्लंड क्रिकेटवर झालेला घाव ब्लिग यांच्या संघाने भरून काढला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 2-1 ने मात देत त्यांनी पुन्हा एकदा मालिका जिंकली.
इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर ब्लिग यांच्या वाग्दत वधू असलेल्या फ्लॉरेन्स मर्फी यांनी त्यावेळी बेल्सची राख करून एका छोट्या कुपीत (The Urn) भरून ब्लिग यांना भेट दिली. ही राख आणि कुपी मैत्री व आदराचे प्रतिक म्हणून देण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही राख पुढे प्रतिष्ठेचा विषय बनवून गेली. मूळ कुपी टेरिकोटा मातीची आणि 4 इंचाची नाजूक होती. पुढे ब्लिग यांच्या मृत्यूपर्यंत ही कुपी त्यांच्या घरीच होती. त्यानंतर ती मेरिलबोन क्रिकेट क्लबमध्ये, लॉर्ड्स म्युझियममध्ये सांभाळून ठेवली आहे.
ऍशेसची सुरुवात झाल्यापासून असे अनेक क्षण आले जे क्रिकेट इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिले गेले. सन 1932-1933 मध्ये झालेल्या ऍशेसने क्रिकेट र’क्तरंजित झाले. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांची अभूतपूर्व फलंदाजी रोखण्यासाठी इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डिन (Douglas Jardine) यांनी ‘बॉडीलाईन’ (Bodyline) नावाची वादग्रस्त रणनिती वापरली.
परफेक्ट टेस्टचा अनुभव देणाऱ्या या मालिकेतील पाच सामन्यात विजय मिळवणारा संघ ऍशेस कुपीची प्रतिकृती आणि ट्रॉफी घेऊन जातो. मालिका बरोबरीत राहिल्यास आधीची मालिका जिंकलेल्या संघाकडे कुपी जाते. यंदा ऑस्ट्रेलिया ऍशेस राखते की इंग्लंड 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियातून ऍशेस घेऊन जाणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
आर्टिकल अपडेट होत आहे…
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज
kridacafe