
Rohit Sharma Hits Most Sixes In ODI History: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला वनडे सामना रांची (Ranchi ODI) येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharmal व विराट कोहली (Virat Kohli) यांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान रोहितने एक मोठा विश्वविक्रम केला.
🚨 Record Alert 🚨
Rohit Sharma now holds the record for most sixes in ODI cricket history! 🙌
TAKE. A. BOW 🙇♂️
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/apcmS1UACG
— BCCI (@BCCI) November 30, 2025
Rohit Sharma Hits Most Sixes In ODI History
रांची वनडेत प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रोहितने संयमी सुरुवात केली. मात्र, हात खोलण्याची संधी मिळतात मुत्थुस्वामी याला सलग दोन षटकार ठोकले. यासोबतच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. आपले अर्धशतक पूर्ण झाल्यावर आणखी एक षटकार मारत त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. रोहितने बाद होण्यापूर्वी 51 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये 5 चौकार व 3 षटकार सामील होते.
रोहितच्या नावे आता 352 वनडे षटकार जमा झाले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावे 351 षटकार तर ख्रिस गेलच्या नावे 321 षटकार होते. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडचा जोस बटलर हा 170 षटकारांवर उभा आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: पुन्हा क्रिकेट मेट बॉलिवूड! या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय Shreyas Iyer?
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।