Breaking News

Syed Modi International 2025 चे सर्व विजेते, श्रीकांतचा संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात पराभव

syed modi international 2025
Photo Courtesy: X

Syed Modi International 2025: भारतातील सर्वात प्रतिष्ठित बॅडमिंटन (Badminton) स्पर्धा असलेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेची रविवारी (30 नोव्हेंबर) सांगता झाली.

Syed Modi International 2025 All Winners

पुरुषांच्या एकेरी अंतिम सामन्यात भारताचा श्रीकांत किदंबी (Srikanth Kidambi) याच्यापुढे हॉंगकॉंगच्या जेसन गुणावान याचे आव्हान होते. गुणावानने 21-16 असा पहिला गेम जिंकत आघाडी घेतली. मात्र, श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये 21-8 असा विजय मिळविला. निर्णायक गेममध्ये गुणावान याने 22-20 असा विजय संपादन करत विजेतेपद पटकावले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या हिना अकेची हिने विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात तिने टर्कीच्या नेसहीन अरीनला 21-16,21-14 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पुरुष दुहेरीत मलेशियाच्या सॅंग-ताई या जोडीने आपल्याच देशाच्या हाओ-चिया जोडीला 21-9,21-19 असे नमवत विजेतेपदावर नाव कोरले.

महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली व गायत्री गोपीचंद या जोडीने एकमेव सुवर्णपदक पटकावले. जपानच्या तनाबे-ओसावा या जोडीने 21-17 असा पहिला गेम जिंकत आघाडी घेतली होती. मात्र, भारतीय जोडीने 21-13,21-15 असे पुनरागमन करत विजेतेपद पटकावले. सिंगापूरच्या आनंदिया व फर्डीनानशा जोडीने 21-19,21-16 असा विजय मिळवत मिश्र दुहेरीचे विजेतेपद उंचावले.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल