
Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी उत्तर दिले.
Ajit Agarkar On Shreyas Iyer Asia Cup Exclusion
एशिया कप संघात श्रेयसला संधी मिळणार नाही याची चर्चा सुरू होती. मंगळवारी जाहीर झालेल्या संघात त्याला स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर सोशल मीडियावर या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली. संघनिवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांना श्रेयस याला का निवडले नाही असा प्रश्न केला गेला. त्यावर उत्तर देताना आदर तर म्हणाले, “श्रेयसचा पूर्ण आदर करून सांगतो की, आम्ही कोणाच्या जागी त्याला खेळवू? यामध्ये त्याची चूक नाही आणि आमची देखील.” या पत्रकार परिषदेत आगरकर यांच्यासोबत कर्णधार सूर्यकुमार यादव हा देखील उपस्थित होता.
श्रेयस हा प्रामुख्याने मधल्या फळीत फलंदाजी करतो. सध्या मधल्या फळीत भारताकडे तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव व शिवम दुबे हे फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने, श्रेयस याला संघात आपली जागा बनवण्यात अपयश येतेय. विशेष म्हणजे श्रेयस याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स यांनी आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. कोलकातासोबत श्रेयस आयपीएल ट्रॉफी उंचावण्यात देखील यशस्वी ठरला होता. मात्र, सद्यस्थितीत तो भारताच्या कसोटी व टी20 संघाचा भाग नाही.
श्रेयससोबतच यशस्वी जयस्वाल याला देखील संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यशस्वी हा 2024 टी20 विश्वचषक विजय त्या संघाचा तिसरा सलामीवीर होता. एशिया कपसाठी सलामीवीर म्हणून संजू सॅमसन, उपकर्णधार शुबमन गिल व अभिषेक शर्मा यांची निवड झाली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का