
Arjun Babuta Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसरे पदक मिळण्याची अपेक्षा होती. पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुता (Arjun Babuta) याने अंतिम फेरी गाठलेली. मात्र, त्याला अंतिम फेरी दुर्दैवाने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
अर्जुन याने या अंतिम फेरीत शानदार सुरुवात करत दुसऱ्या क्रमांकावर आपला हक्क गाजवला. त्यानंतर 9.9 चा एक शॉट आल्याने त्याची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती. मात्र, त्याने पुन्हा एकदा पुनरागमन करत पहिल्या तीनमध्ये जागा मिळवली. एलिमिनेशन सुरू झाल्यानंतरही तो पहिल्याच चारमध्ये कायम होता.
त्याच्या अखेरच्या शॉटमध्ये त्याला ब्रॉंझ मेडल मिळवण्यासाठी 10.8 अशा शॉटची गरज होती. मात्र, त्याला यात अपयश आले. सकाळच्या सत्रात महिला नेमबाज रमिता जिंदाल ही देखील याच प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र, तिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले.
(Arjun Babuta Missed Medal In Paris Olympics 2024)