
BBL 2025-26 Draft: ऑस्ट्रेलियातील प्रमुख टी20 लीग असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेसाठीच्या विदेशी खेळाडूंच्या ड्राफ्टची घोषणा झाली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांनी प्रत्येकी तीन विदेशी खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवले. या ड्राफ्टमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना विशेष मागणी असल्याचे दिसले.
BBL 2025-26 Draft
The #BBL15 Draft 🙌
Here's what happened 👇 pic.twitter.com/BDFDV4ZogT
— KFC Big Bash League (@BBL) June 19, 2025
सध्या बिग बॅश विजेते असलेला होबार्ट हरिकेन्स संघाने इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस जॉर्डन, इंग्लंडचा युवा फिरकीपटू रेहान अहमद व बांगलादेशचा अष्टपैलू रिशाद हुसेन यांची निवड केली. तर, उपविजेता सिडनी थंडर्स यांनी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान व इंग्लंडचा अनुभव फलंदाज सॅम बिलिंग्स यांना निवडले. सिडनी सिक्सर्सने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन व इंग्लंडचा युवा लेगस्पिनर जाफर चोहान यांना आपल्या संघाचा भाग बनवला.
स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या पर्थ स्कॉर्चर्स यांनी न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन, इंग्लंडचा अष्टपैलू लॉरी इवान्स आणि इंग्लंडचाच डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड पेन यांना आगामी हंगामासाठी निवडले. ब्रिस्बेन हीट संघाने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi), न्यूझीलंडचा दिग्गज कॉलिन मन्रो व इंग्लंडचा अष्टपैलू टॉम असलोप यांच्यावर विश्वास दाखवला.
मेलबर्न स्टार्सने पाकिस्तानच्या हारिस रौफ याला रिटेन केले. त्याच्यासोबत इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करन व इंग्लंडचा फलंदाज जो क्लार्क यांची निवड केली. मेलबर्न रेनिगेड्सने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान व हसन खान यांच्यासोबत न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट यांना आपल्या संघाचा भाग बनवले. ऍडलेड स्ट्रायकर्सने इंग्लंडचे अष्टपैलू जेमि ओवर्टन व ल्युक वूड यांच्यासह पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली यांना आगामी हंगामासाठी आपल्या संघात संधी दिली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: अखेर Kochi Tuskers Kerala कोर्टात जिंकली! BCCI ला इतक्या कोटींचा दणका