
Chennai Bulls Won Rugby Premier League 2025: पहिल्या रग्बी प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला गेला. चेन्नई बुल्स संघाने दिल्ली रेड्झ (Delhi Redz) संघाचा पराभव करत पहिला हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात हैदराबाद हिरोजने बेंगलोर ब्रेवहार्ट्सचा पराभव केला.
Chennai Bulls demolish Delhi Redz to lift inaugural Rugby Premier League title 💪
Chennai Bulls 41 – 0 Delhi Redz pic.twitter.com/Oy4PTAMKEC
— ESPN India (@ESPNIndia) June 29, 2025
Chennai Bulls Won Rugby Premier League 2025
प्रथमच झालेल्या या स्पर्धेत चेन्नई बुल्स व दिल्ली रेड्झ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, अंतिम सामन्यात चेन्नईने दिल्लीला एकही गुण मिळू दिला नाही. चेन्नईने 41-0 असा एकतर्फी विजय मिळवत ट्रॉफी उंचावली. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या बेंगलोर ब्रेवहार्ट्स व हैदराबाद हिरोज यांच्यातील सामन्यात हैदराबादने 17-12 अशी सरशी साधत तिसरा क्रमांक पटकावला.
भारताचा माजी रग्बीपटू आणि अभिनेता राहुल बोस याच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केलेली होती. यामध्ये सहा संघांनी सहभाग नोंदवलेला. स्पर्धेचा पहिलाच हंगाम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।