
ENG vs IND Headingley Test Day 2: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. हेडिंग्ले येथे होत असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने पुनरागमन केले. भारतीय संघाला 500 धावांच्या आतमध्ये रोखल्यानंतर, केवळ तीन फलंदाज गमावत इंग्लंडने 200 च्या पुढे मजल मारली आहे. रिषभ पंत याचे शतक (Rishabh Pant Century), ओली पोप याचे नाबाद शतक (Ollie Pope) व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची गोलंदाजी दुसऱ्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली.
ENG vs IND Headingley Test Day 2 Highlights
Ollie Pope holds the fort for England despite the Jasprit Bumrah threat 💪#ENGvIND 📝: https://t.co/FXxW1HkGLm pic.twitter.com/RU4KanQLiT
— ICC (@ICC) June 21, 2025
– पहिल्या दिवशीच्या 3 बाद 359 वरून भारतीय संघाची सुरुवात
– शुबमन गिल व रिषभ पंत यांनी सुरुवातीला संयम दाखवत मोठी केली भागीदारी
– रिषभ पंतने यादरम्यान आपले 7 वे कसोटी शतक पूर्ण केले, इंग्लंडमधील त्याचे तिसरे शतक
– शुबमन गिल 147 धावा करून बाद
– तब्बल सात वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा करूण नायर शून्यावर तंबूत
– पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी रिषभ 134 व शार्दुल ठाकूर एका धावेवर बाद
– दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला केवळ 17 धावांमध्ये भारताचे उर्वरित तीन फलंदाज बाद, भारताचा पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा
– इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स व जोन टंगचे प्रत्येकी 4 बळी, कार्स व बशीर यांनी ही टिपले 1-1 बळी
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
– पावसाच्या व्यत्ययात इंग्लंडच्या डावाला उशिरा सुरुवात
– जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात केले झॅक क्राऊलीला बाद
– रविंद्र जडेजाने वैयक्तिक 15 धावांवर सोडला बेन डकेटचा झेल
– चहापानाला खेळ थांबेपर्यंत इंग्लंडने मारली 1 बाद 107 अशी मजल
– शेवटच्या सत्राला सुरुवात होताच ओली पोप व बेन डकेट यांनी पूर्ण केली अर्धशतके
– पोप-बकेटची 122 धावांची भागीदारी बुमराहने तोडली, बकेटने केल्या 62 धावा
– ओली पोपचा झेल सोडत यशस्वी जयस्वालने दिले जीवदान
– पोपने तिसऱ्या सत्राच्या अखेरीकडे जाताना पूर्ण केले 9 वे कसोटी शतक
– पुढच्याच चेंडूवर जो रूट 26 धावा करून बाद होत ठरला बुमराहचा तिसरा शिकार
– दिवसाच्या अखेरच्या षटकात हॅरी ब्रूकने सोपवला सिराजच्या हाती झेल, मात्र नो बॉल असल्याने मिळाले जीवदान
– दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या 3 बाद 209 धावा, पोप 100 तर ब्रूक शून्यावर नाबाद
– भारतीय संघाकडे अद्याप 262 धावांची आघाडी
हे देखील वाचा: ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।