Breaking News

Ashes 2025-2026 साठी इंग्लंडचा संघ घोषित, 15 वर्षाचा वनवास संपणार का?

ashes 2025-2026
Photo Courtesy: X

England Squad For Ashes 2025-2026: जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌ऍशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत‌ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत बेन‌ स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल. मागील पंधरा वर्षांपासून इंग्लंड ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे यावेळी हा वनवास संपवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

England Squad For Ashes 2025-2026

भारतीय संघाविरुद्ध नुकतीच झालेली मालिका बरोबरीत सुटल्याने इंग्लंड संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये नुकसान झाले. तर, ऑस्ट्रेलिया संघाची सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी हुकली होती. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या मालिकेत दोन्ही संघ जोरदार संघर्ष करताना दिसतील.

इंग्लंड संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा बेन स्टोक्स करताना दिसणार आहे. भारताविरुद्ध उपकर्णधार म्हणून काम केलेल्या ओली पोप याला आपली ही भूमिका कायम ठेवण्यात अपयश आले. इंग्लंडच्या निवड समितीने त्याच्या जागी हॅरी ब्रूक याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. इंग्लंड संघात केवळ अष्टपैलू विल जॅक्स याचे नाव आश्चर्यचकित करणारे दिसून आले. इंग्लंडने अखेरच्या वेळी 2010-2011 मध्ये ऑस्ट्रेलियात ऍशेस जिंकली होती. त्यानंतर त्यांना सातत्याने अपयश आलेले आहे.

ऍशेस 2025-2026 साठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जेकब बेथल, विल जॅक्स, शोएब बशीर, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, ख्रिस वोक्स, मॅट पॉट्स, मार्क वूड, जोश टंग.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास