Breaking News

“Yuvraj Singh ला 2011 वनडे वर्ल्डकपसाठी निवडणार नव्हते पण…” गॅरी कर्स्टन यांचा 14 वर्षांनी गौप्यस्फोट

yuvraj singh
Photo Courtesy: X

Gary Kirsten On Yuvraj Singh 2011 ODI World Cup Selection: भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. भारतीय संघाच्या या विजयात अष्टपैलू युवराज सिंग याचा सिंहाचा वाटा राहिलेला. मात्र, युवराज याला या विश्वचषकासाठी निवडण्यात येणार नव्हते, असा मोठा खुलासा तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केला आहे. 

Gary Kirsten On Yuvraj Singh 2011 ODI World Cup Selection

कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने तब्बल 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक उंचावला होता. या विश्वचषकाबाबत एका मुलाखतीत विचारले असताना कर्स्टन म्हणाले, “आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे की, युवराज त्यावेळी भारतीय संघात होता. त्याची निवड सहजासहजी झाली नव्हती. निवड समितीतील सदस्य त्याच्या निवडी विरोधात होते. मात्र, एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या नावासाठी आग्रहा धरला. मला देखील तो संघात हवा होता. त्याचा अनुभव संघाच्या कामी येणार होता.”

ते पुढे म्हणाले, “युवराजला त्या स्पर्धेसाठी तयार करण्यात पॅडी अप्टन यांची महत्त्वाची भूमिका होती. शेवटी सगळे व्यवस्थित झाले आणि आपण पाहिले युवराज कशा पद्धतीने खेळला.”

युवराजने संपूर्ण स्पर्धेत 362 धावा व 15 बळी मिळवले होते. या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला. विश्वचषकानंतर लगेचच युवराज याला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याने दोन वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Ruturaj Gaikwad ने सोडला संघ, तडकाफडकी घेतला निर्णय, 22 जुलैला…