Breaking News

दिग्गज म्हणतोय “Ruturaj Gaikwad च टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार”, कारणही दिले

RUTURAJ GAIKWAD
Photo Courtesy: X//BCCI

Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर‌ गेला होता. तिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी करत कौतुक वसूल केले.‌ असे असतानाच आता वरिष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.

आयपीएल 2020 पासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऋतुराज याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. मागील वर्षी झालेल्या ‌एशियन गेम्समध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले. त्याच्या नेतृत्वात संघाने सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावर देखील त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या. पहिल्या सामन्यात अपयश आल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात नाबाद 77 व तिसऱ्या सामन्यात 49 धावांची खेळी त्याने केली.

ऋतुराज याचा खेळ क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराला साजेसा असल्याचे म्हटले जाते. याच मुद्द्याला धरून समालोचक हर्षा भोगले यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना म्हटले,

“तुम्ही आता ऋतुराजचा मागील तीन-चार सामन्यातील ‌खेळ पाहू शकता. ते पाहून तुम्हाला जर असे वाटत असेल की, ऋतुराज भारतीय संघात खेळू शकत नाही, ‌तर हा संघ वेगळ्या ग्रहावरील आहे असे मी मानतो. तो सगळ्या प्रकारचा खेळ करण्यास सक्षम आहे. भारतीय क्रिकेटचा पुढील सुपरस्टार बनण्याची क्षमता नक्कीच त्याच्यामध्ये दिसून येते.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

ऋतुराज याने भारतासाठी आतापर्यंत ‌22 टी20 सामने खेळताना 633 धावा बनवल्या आहेत.‌ यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 143 तर 39 सरासरी इतकी राहिलीये. त्याच्या नावे एक शतक व 4 अर्धशतके आहेत. तर, वन डे क्रिकेटमध्ये त्याने 6 सामने खेळताना 115 धावा जमवल्या असून, त्याला अद्याप कसोटी संघात पदार्पण करता आले नाही.

(Harsha Bhogle Said Ruturaj Gaikwad Is Next Superstar)