
IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला रविवारी (6 जून) सुरुवात होत आहे. ग्वालियर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यातच भारताकडून दोन युवा खेळाडू पदार्पण करताना दिसतील. युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) व अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी या सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Take a look at #TeamIndia's Playing XI for the T20I series opener 👌👌
Mayank Yadav and Nitish Kumar Reddy make their Debuts 🙌
Live – https://t.co/Q8cyP5jpVG#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/wI4hzfEVx0
— BCCI (@BCCI) October 6, 2024
आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारत आत्तापासूनच संघबांधणी करत आहे. त्यामुळे या सामन्यात 155 किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादव (Mayank Yadav Debut) याला संधी मिळाली. आयपीएल 2024 मध्ये त्याने आपल्या वेगाने जगभरातील सर्व क्रिकेट समीक्षक व चाहत्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याला भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक याच्या हातून कॅप देण्यात आली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मयंक प्रमाणेच आयपीएल 2024 मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजीने नितिशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. त्यानंतर त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेली. मात्र, त्यावेळी अचानक दुखापतग्रस्त झाल्याने त्याचे पदार्पण लांबणीवर पडलेले. त्याला भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याच्या हातून कॅप देण्यात आली.
पहिल्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, नितिशकुमार रेड्डी, रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मयंक यादव, वरूण चक्रवर्ती.
(Mayank Yadav And Nitish Kumar Reddy Making India Debut)
हे देखील वाचा: IND v BAN T20I Preview: कसोटीनंतर टी20 ची बारी! सूर्याची टीम इंडिया करतेय मालिकाविजयाची तयारी