IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब सुरुवातीनंतर भारताचा डाव सावरला.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. स्वतः रोहित शर्मा केवळ 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंत यांनी आक्रमक फलंदाजी करत 20 धावा जोडल्या. अडखळत खेळत असलेल्या विराट कोहली याने 24 धावांचे योगदान दिले. तर, शिवम दुबे याने 10 धावांचे योगदान दिले.
केवळ 90 धावांमध्ये चार गडी बाद झालेले असताना. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या ही जोडी जमली. दोघांनी 37 चेंडूंमध्ये 60 धावांची भागीदारी केली. सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करताना सूर्याने केवळ 28 चेंडूंमध्ये 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. तर, दुसऱ्या बाजूने हार्दिक याने देखील 24 चेंडूमध्ये 32 धावांचे योगदान दिले.
अखेरीस अक्षर पटेल व अर्शदीप सिंग यांनी महत्वपूर्ण योगदान देत संघाला 181 पर्यंत पोहोचवले. अफगाणिस्तानसाठी कर्णधार राशिद खान याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(IND vs AFG Surya Hardik Innings Reach India On 181)