Breaking News

WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द

wcl 2025
Photo Courtesy: X

WCL 2025: निवृत्त क्रिकेटपटूंची लीग असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (India Champions vs Pakistan Champions) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंच्या विरोधानंतर हा सामना रद्द करण्यात आला.

India Champions vs Pakistan Champions Match Called Of In WCL 2025

सलग दुसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेत पहिला हंगामातील अंतिम फेरी भारत व पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने पाकिस्तानला हरवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर दुसऱ्या हंगामात देखील या संघांमध्ये साखळी फेरीचा सामना खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिला.

इंडिया चॅम्पियन्स संघातील महत्त्वाचे सदस्य असलेल्या हरभजन सिंग, सुरेश रैना, युसुफ पठाण व इरफान पठाण या खेळाडूंनी आपण या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर इतर खेळाडूंनी देखील हीच भूमिका घेतली. त्यामुळे आयोजकांनी हा सामना रद्द केला जात असल्याचे सांगितले. (Latest Cricket News)

एप्रिल महिन्यात काही दहशतवाद्यांनी भारतातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे हल्ला करत भारतीय नागरिकांचा बळी घेतला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करत दहशतवादी तळ नष्ट केलेले. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होतेय.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर