
Indian Challenge In Kumamoto Japan Masters 2025: जपानमधील कुमामोटो येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कुमामोटो मास्टर्स जपान 2025 मध्ये पाच भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आपले आव्हान सादर करतील. यामध्ये ऑलिम्पियन लक्ष्य सेन (Lakshya Sen) व एच.एस प्रणॉय यांच्यासह युवा आयुष शेट्टी (Ayush Shetty), किरण जॉर्ज आणि एम. थरुन यांचा समावेश आहे. तर, महिला गटात भारताकडून केवळ नायशा कौर भटोये (Naishaa kaur Bhatoye) ही एकटीच सहभागी होईल.
Indian Challenge In Kumamoto Japan Masters 2025
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला लक्ष्य सेन स्थानिक स्टार कोकी वातानाबेविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. तर कुमामोटो प्रीफेक्चरल जिम्नॅशियम येथे खेळल्या जाणाऱ्या या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धेत प्रणॉय पहिल्या फेरीत मलेशियाच्या लिओंग जुन हाओविरुद्ध लढेल. यावर्षी भारतासाठी एकमेव बीडब्लूएफ जिंकणारा बॅडमिंटनपटू असणारा आयुष कसे कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
महिला गटात दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही सिंधू ही सहभागी होणार नाही. तिच्या व्यतिरिक्त इतरही वरिष्ठ बॅडमिंटनपटूनी माघार घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची केवळ सतरा वर्षाची नायशा भारताचे प्रतिनिधित्व करेल. पुरुष दुहेरीत देखील भारताचा कोणताही संघ सहभागी होणार नाही. तर, मिश्र दुहेरीत रोहन कपूर व ऋत्विका गड्डे भारताच्या प्रतिनिधित्व करतील.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?
kridacafe