Breaking News

Indian Cricket Team:सिनियर खेळाडूंसाठी गंभीरने लावला नवा नियम, श्रीलंका दौऱ्याआधी कॅप्टन्सी बदलाचेही वारे, वाचा सर्व अपडेट

indian cricket team
Photo Courtesy: X/Suryakumar Yadav

Indian Cricket Team Updates: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे (India Tour Of Srilanka). या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची ‌टी20 मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाबद्दल काही अपडेट समोर येत आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याला सर्व वरिष्ठ खेळाडू वनडे संघात हवे आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, या दौऱ्यातून कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेतून उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा वैयक्तिक कारणाने माघार घेऊ शकतो. मात्र, टी20 मालिकेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

भविष्यातील भारतीय संघाच्या वनडे संघाचा कर्णधार म्हणून हार्दिकसह केएल राहुल व शुबमन गिल यांच्या नावाची देखील चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर न गेल्यास या दोघांपैकी एक जण संघाचे नेतृत्व करू शकतो.

याव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व बीसीसीआय कसोटी संघातील स्पेशालिस्ट खेळाडूंनी दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) खेळावी यासाठी आग्रही आहेत. यातून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना सूट दिली जाऊ शकते. सध्या भारतीय संघात‌ केवळ सर्फराज खान व आर अश्विन हे दोनच खेळाडू केवळ कसोटी खेळतात.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 27 जुलै, 28 जुलै व 30 जुलै रोजी टी20 सामने खेळेल. हे सर्व सामने पलेकले येथे होणार आहेत. त्यानंतर 2 ऑगस्ट, 4 ऑगस्ट व‌ 7 ऑगस्ट रोजी वनडे सामने होतील.‌ हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.

(Indian Cricket Team Updates Before India Tour Of Srilanka 2024)

“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान