Breaking News

भारताची नवी ‘गोल्डन गर्ल’ Deepthi Jeevanji| विश्वविक्रमासह जिंकले ऍथलेटिक्समधील सुवर्ण

भारताची पॅरा ऍथलिट दीप्ती जीवनजी (Deepthi Jeevanji) हिने सोमवारी (20 मे) भारतीय क्रीडा इतिहासातील एक अविस्मरणीय कामगिरी नोंद केली. जपान येथील कोबे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 400 मीटर टी20 या प्रकारात धावण्याची स्पर्धा 55.07 सेकंद वेळेत पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला. तिने अमेरिकन ऍथलेट ब्रेना क्लार्कचा पॅरिसमध्ये बनवलेला विश्वविक्रम मोडीत काढला.

भारताची आघाडीची पॅरा ऍथलिट असलेल्या दीप्तीने या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पात्रता हिटमध्ये आशियाई विक्रम नोंदवला होता. यावेळी तिने 56.18 सेकंदांची वेळ नोंदवली होती. अंतिम फेरीत मात्र तिने यापुढे एक पाऊल जात थेट भारताच्या खात्यात सुवर्णपदक टाकले. विशेष म्हणजे केवळ दोन वर्षांपूर्वी धावण्यास सुरुवात केलेल्या दीप्ती हिने हे यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत भारतीय पथकाने आतापर्यंत चार पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्णपदक एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. ही स्पर्धा 17 मे रोजी सुरू झाले असून, 25 मे पर्यंत खेळली जाईल. त्यामुळे भारत आता आणखी किती पदके पटकावतो याकडे पाहणे रंजक ठरेल.

(Indian Para Athlete Deepthi Jeevanji Set World Record In World Para Athletics Championship)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *