
T20 World Cup 2024 INDvPAK Preview| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (9 जून) सर्वात मोठा सामना खेळला जाईल. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) या सामन्यात समोरासमोर येणार आहेत. सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याचे भारताचे लक्ष असेल. तर, यूएसएकडून झालेल्या पराभवानंतर स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.
Excitement, Anticipation, Energy and a lot of buzz ahead of a riveting contest 🤩
New York gets ready for an epic clash and #TeamIndia fans are pumped 🆙 for #INDvPAK 🙌 – By @RajalArora
WATCH 🎥 🔽 #T20WorldCup https://t.co/g8k1L5FC0m
— BCCI (@BCCI) June 8, 2024
टी20 विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान आठ वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी सात वेळा भारताने विजय संपादन केला आहे. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे होणाऱ्या या सामन्यात देखील भारताचे पारडे जड आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सहज पराभव केला. तर, पाकिस्तानला आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणी हार यूएसएकडून पत्करावी लागली.
या सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक नजर ही विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असेल. विराटने विश्वचषकात सातत्याने पाकिस्तानविरुद्ध धावा केल्या आहेत. त्याला कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत व सूर्यकुमार यादव साथ देतील. उपकर्णधार हार्दिक पंड्या हा या सामन्यात एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीत भारताची मदार प्रामुख्याने जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व रवींद्र जडेजा यांच्यावर असेल.
पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार बाबर आझम याच्यासह मोहम्मद रिझवान, फखर झमान व इफ्तिखार अहमद यांना निभवावी लागेल. शादाब खान याच्या अष्टपैलू खेळावर देखील अनेकांचे लक्ष असेल. गोलंदाजीत त्यांच्याकडे शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शहा व मोहम्मद अमीर असा तोफखाना आहे. मात्र, हे सर्वजण यूएसएविरुद्ध अपयशी ठरले होते.
हा सामना रविवारी सायंकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 वाजता सुरू होईल. या सामन्यावर पावसाचे सावट नसेल. त्यामुळे पूर्ण षटकांचा सामना चाहत्यांना पाहायला मिळेल नॅसॉ काऊंटी स्टेडियम येथील खेळपट्टीवर सर्वांचीच नजर असणार आहे. ही खेळपट्टी अत्यंत नवी असल्याने चेंडू कधी अचानक उसळी घेताना तर कधी खाली राहताना दिसतोय. त्यामुळे या मैदानावर 170 धावा या चांगल्या मानल्या जातील.
(INDvPAK Preview T20 World Cup 2024)
आता चढला T20 World Cup 2024 ला रंग! छोट्या संघांची मोठी उडी, पाहा Point Tables