Breaking News

अखेर Khel Ratna Award 2024 चा तिढा सुटला! ‘या’ चौघांना मिळणार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार

khel ratna award 2024
Photo Courtesy: X

Khel Ratna Award 2024: भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award 2024) यावेळी चार खेळाडूंना देण्यात येईल. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker), विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश (D Gukesh), पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग व पॅरा ऍथलिट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे.

Khel Ratna Award 2024 Announced

मनू भाकेर हिची यापूर्वी या पुरस्कारासाठी निवड झाली नव्हती. तांत्रिक बाबींमुळे तिचे नाव पहिल्या यादी समाविष्ट केले नव्हते. याप्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर आता अंतिम यादीत तिचा समावेश केला गेला आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल व 25 मीटर मिश्र प्रकारात कांस्य पदके जिंकली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी ती पहिली भारतीय ठरलेली.

डिसेंबर महिन्यातच झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश याने चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकलेले. केवळ वयाच्या 18 वर्षी त्याने ही कामगिरी केली. त्याला सगळ्यात कमी वयात विश्वविजेता होण्याचा मान मिळाला. त्यामुळे त्याचा या पुरस्कारासाठी विचार केला गेला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला देखील या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आपल्या नावे केले. विशेष म्हणजे हरमनप्रीत भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलेला‌.

पॅरिस येथेच झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत T64 उंच उडी या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा प्रवीण कुमार हा देखील खेलरत्न पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने आशियाई विक्रमासह ही स्पर्धा जिंकलेली. या चौघां व्यतिरिक्त 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने देखील गौरवण्यात येईल.

(Khel Ratna Award 2024 Announced)

हे देखील वाचा- Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..