Breaking News

Kho-Kho World Cup 2025 चे सेमीफायनल सामने आज, भारताचे दोन्ही संघ मैदानात, येथे पाहता येणार लाईव्ह

Kho-Kho World Cup 2025
Photo Courtesy: X

Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (18 जानेवारी) खेळले जातील. भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ उपांत्य फेरीत असून, दोन्ही संघांचे सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND v SA) होतील.

Kho-Kho World Cup 2025 Semi Finals

भारतीय पुरुष संघाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करत एकही पराभव न पत्करता उपांत्यपूर्व फेरी धडक मारली होती. साखळी फेरीत संघाने नेपाळ, सुलतान, पेरू व ब्राझील यांना पराभूत केले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेला त्यांनी मात दिली. भारतीय संघासाठी कर्णधार प्रतिक वायकर (Pratik Waikar) याच्यासह अनिकेत पोटे, आदित्य गणपुले व रामजी कश्यप यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांना रोक्सन सिंग व आकाश यांनी तितकीच उत्कृष्ट साथ दिलेली दिसून येते.

दुसऱ्या बाजूला महिला संघाने देखील पुरुष संघाचा कित्ता गिरवत एकही पराभव पत्करलेला नाही. कर्णधार प्रियंका इंगळे (Priyanka Ingle) हिच्या नेतृत्वात भारताने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत जागा बनवली आहे.‌

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

महिला विभागात सायंकाळी 4.30 वाजता युगांडा ‌ व नेपाळ यांच्या दरम्यान पहिला उपांत्य सामना होईल. तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा उपांत्य सामना ‌7 वाजता रंगेल. पुरुष विभागात पहिल्या सामन्यात इराण व नेपाळ आमने-सामने येणार आहेत. सायंकाळी.4.45 वाजता हा सामना सुरू होईल. तर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा दुसरा उपांत्य सामना सायंकाळी आठ वाजता खेळला जाईल. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा व स्पोर्ट्स 18 करतील.

(Kho-Kho World Cup 2025 Semi Final Schedule)

प्रेरणादायी गोष्ट भारताचा कॅप्टन Pratik Waikar ची, खो-खो वर्ल्डकप 2025 गाजवायला सज्ज