
Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटातील अव्वल सोळा संघ निश्चित झाले. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जुलै रोजी खेळले जातील. सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गट फेरीतील सामने समाप्त झाले. त्यानंतर पुढील फेरीत पोहोचलेले सोळा संघ निश्चित करण्यात आले. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जुलै रोजी होणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी उपांत्यपूर्व फेरी, 19 जुलै रोजी उपांत्य फेरी व 20 जुलै रोजी अंतिम सामना होईल.
उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने पुढील प्रमाणे:
1. मुंबई शहर पश्चिम विरुद्ध कोल्हापूर
2. बीड विरुद्ध नंदुरबार
3. पुणे ग्रामीण विरुद्ध ठाणे शहर
4. मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व
5. अहमदनगर विरुद्ध मुंबई शहर पूर्व
6. पिंपरी चिंचवड विरुद्ध ठाणे ग्रामीण
7. सांगली विरुद्ध पालघर
8. रत्नागिरी विरुद्ध पुणे शहर
(Maharashtra State Kabaddi Championship 2024 Final 16)