Breaking News

मुंबईत पोहोचताच ‘त्या’ व्यक्तीसोबत दिसली Natasha Stankovic, हार्दिकची भेट टाळली पण…

NATASHA STANCOVIC
Photo Courtesy: X

Natasha Stankovic In Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) मुंबईत परतली आहे. नुकताच हार्दिक आणि ताचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी ती भारत सोडून मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा भारतात परतली असून, आपल्या खास मित्रासोबत दिसून आली.

नताशा बऱ्याच दिवसांनी मुंबईत आली आहे. नुकतेच नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या जुन्या मित्रासोबत दिसत आहे. नताशाने ऍलेक्झांडर एलिक (Alexander Ilic) यांच्यासोबत वर्कआउट सेल्फी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी नताशा आणि अलेक्झांडरच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. त्याच दरम्यान नताशा एका हॉटेलबाहेर ऍलेक्झांडर बाहेर दिसली होती. त्यानंतर लोकांनी या दोघांची नावे एकमेकांशी जोडण्यास सुरुवात केलेली. एका रिपोर्टनुसार, नताशा व ऍलेक्झांडर हे नातलग असल्याचे सांगण्यात आले होते.

(Natasha Stankovic Met Alexander Ilic In Mumbai)

घटस्फोटाच्या महिनाभरानंतरच हार्दिक रिलेशनशिपमध्ये? वाचा कोण आहे ब्रिटिश सुंदरी Jasmin Walia