Breaking News

आंतरराष्ट्रीय पटलावर Nepal Cricket चा सूर्योदय! विंडीजला लोळवत घडवला इतिहास

nepal cricket
Photo Courtesy: X

Nepal Cricket Team Registered Historic Series Win Against West Indies: नेपाळ क्रिकेट संघाने ‌ सोमवारी (29 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत त्यांनी मालिका आपल्या नावे केली. कोणत्याही कसोटी दर्जा असलेल्या आयसीसी संघाविरुद्धचा त्यांचा हा पहिलाच मालिकाविजय ठरला.

Nepal Cricket Team Registered Historic Series Win Against West Indies

शारजा येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नेपाळने तब्बल 90 धावांनी विजय मिळवला. आसिफ शेख व संदीप जोरा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर नेपाळने 173 अशी मोठी धावसंख्या उभी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ‌वेस्ट इंडिज संघ केवळ 83 धावांमध्ये सर्वबाद झाला. नेपाळसाठी मोहम्मद आलम याने चार तर कुशल भुर्तेल याने तीन बळी मिळवले. मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील नेपाळने 19 धावांनी विजय साजरा केला होता.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Mithun Manhas च बनला BCCI अध्यक्ष! बिनविरोध झाली निवड