Breaking News

Ballon D’or 2025 जिंकत डेम्बेले बनला जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलर! बोनमॅटीची हॅट्ट्रिक

ballon d or
Photo Courtesy: X

Ousmane Dembele Won Ballon D’or 2025: फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता जाहीर झाला आहे. फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मनचा फॉरवर्ड उस्मान डेम्बेले याने यावर्षीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्याने स्पेनच्या लमिन यमाल (Lamine Yamal) याला मागे सोडले. महिला विभागात स्पेनची ऐताना बोनमॅटी (Aitana Bonmati) सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम ठरली.

Ousmane Dembele Won Ballon D’or 2025

वर्षभरात सर्वात कामगिरी करणाऱ्या खेळाडूला फुटबॉलविश्वात बॅलन डी’ओर पुरस्काराने गौरवण्यात येते. किलायन एम्बाप्पे रियल माद्रिदकडे गेल्यानंतर डेम्बेले याने पीएसजीची धुरा आपल्या खांद्यावर घेत हंगामात 36 गोल झळकावले. त्याच्याच नेतृत्वात संघाने प्रथमच युरोपियन चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला. यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर स्पेनचा यमाल व ब्राझीलचा राफिन्हा हे खेळाडू राहिले. स्पेनची कर्णधार ऐताना बोनमॅटी सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम महिला फुटबॉलर बनण्यात यशस्वी ठरली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम