
Paris Olympics 2024 Ended: खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) ची रविवारी (11 ऑगस्ट) समाप्ती झाली. जगभरातील तब्बल 206 देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास 17 दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये केले गेले. स्पर्धेतील सर्व खेळांचा समाप्तीनंतर आता अंतिम मेडल टॅली समोर आली असून, तब्बल 84 देश पदक जिंकण्यात यशस्वी ठरले (Paris Olympics 2024 Medal Tally).
पॅरिस ऑलिंपिक्स 2024 ची फायनल मेडल टॅली 🏅
भारत 1 रौप्य आणि 5 कांस्यासह 71 व्या स्थानी#ParisOlympics2024 #MedalTally pic.twitter.com/KWCBRDbAnx— पॅरिस ऑलिंपिक्स 2024 अपडेट्स (मराठी) (@KridaCafe) August 11, 2024
ऑलिंपिक्स इतिहासातील सर्वात यशस्वी देश असलेल्या अमेरिकेने या स्पर्धेवर देखील आपले राज्य कायम राखले. चीनसोबत पहिल्या स्थानासाठी त्यांना कडवी लढत द्यावी लागली. अमेरिकेने स्पर्धेतील अखेरचा इव्हेंट असलेल्या महिलांच्या बास्केटबॉलचे सुवर्णपदक जिंकत 40 सुवर्णपदके पूर्ण केली. त्यांनी 40 सुवर्णपदकांसह 44 रौप्य व 42 कांस्य पदके जिंकली. एकूण 126 पदकांसह त्यांनी पहिले स्थान आपलेसे केले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चीनने देखील त्यांना चांगली लढत दिली. त्यांनी 40 सुवर्णपदके, 27 रौप्य व 24 कांस्यासह एकूण 91 पदके आपल्या नावे केली. एकूण 45 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जपानने 20 सुवर्ण, 12 रौप्य व 13 कांस्य जिंकली. चौथा क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया 18 सुवर्णपदकासह एकूण 54 तर, पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या यजमान फ्रान्सने 16 सुवर्णपदकांसह एकूण 64 पदके आपल्या नावे केली.
पहिल्या दहामध्ये 16 सुवर्णांसह नेदरलँड, 14 सुवर्णांसह ग्रेट ब्रिटन सातव्या, 13 सुवर्णांसह दक्षिण कोरिया आठव्या आणि प्रत्येकी 12 सुवर्णंसह इटली व जर्मनी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर राहिले.
भारतीय पथकाने या ऑलिंपिक्समध्ये आपल्या इतिहासातील तिसरी सर्वोत्तम कामगिरी केली. भारताचे 117 खेळाडूंचे पथक यावेळी स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, एकाही भारतीय खेळाडूला सुवर्णपदक जिंकण्यात यश आले नाही. टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा याने यावेळी रौप्य पदक आपल्या नावे केले. याव्यतिरिक्त मनू भाकेर हिने एक वैयक्तिक व मिश्र प्रकारात सरबजोत सिंगसह नेमबाजीत कांस्य जिंकली. रायफल शूटर स्वप्निल कुसळे, भारतीय पुरुष हॉकी संघ व कुस्तीपटू अमन सेहरावत कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरले. यासह भारत या पदकतालिकेत 71 व्या क्रमांकावर राहिला.
(Paris Olympics 2024 Medal Tally USA Top)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।