
Rescheduling Of India Tour Of Bangladesh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) व बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्याला स्थगिती देण्यात आली असून, हा दौरा आता थेट सप्टेंबर 2026 मध्ये होईल. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨
Rescheduling of India’s white-ball Tour of Bangladesh.
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/qaOWJBgJdu
— BCCI (@BCCI) July 5, 2025
Rescheduling Of India Tour Of Bangladesh
सध्या बांगलादेशमधील राजकीय स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे या दौऱ्याचा अंतिम निर्णय भारत सरकार घेणार होते. तसेच बीसीबीने देखील हा दौरा भविष्यात केला तरी, आपल्याला काही अडचण नसेल असे स्पष्ट केलेले. त्यानंतर आता बीसीसीआयने या गोष्टीवर मोहर उमटवली आहे. तीन वनडे व टी20 सामन्यांचा हा दौरा थेट सप्टेंबर 2026 मध्ये खेळला जाईल. नियोजित कार्यक्रमानुसार, या दौऱ्याला 16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार होती. (Latest Cricket News)
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा पुढे ढकलल्याने आता रोहित शर्मा व विराट कोहली यांचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन लांबले आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता थेट ऑस्ट्रेलियात भारतीय संघाच्या जर्सीत दिसतील. रोहित व विराट यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Rohit-Virat चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणार? त्या 3 वनडेचा निर्णय भारत सरकारच्या कोर्टात