
Rishabh Pant Ruled Out: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या मँचेस्टर कसोटीतून भारतीय संघासाठी निराशाजनक बातमी येत आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत हा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला. तो किमान सहा आठवडे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताला चालू मँचेस्टर कसोटीत आता दहा खेळाडूंसोबतच खेळावे लागेल.
Rishabh Pant Ruled Out From England Tour
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना पंत याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला चेंडू लागला. त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंत याच्या अंगठ्याची दुखापत गंभीर असून, फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो किमान सहा आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. या कारणाने मँचेस्टर कसोटीत भारत केवळ 10 फलंदाजांसह खेळेल. यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल जबाबदारी पार पाडेल. मात्र, त्याला फलंदाजी करता येणार नाही.
संघ व्यवस्थापनाने पंत याचा पर्याय म्हणून पाचव्या कसोटीसाठी इशान किशन याला संघात सामील होण्यास सांगितल्याचे समजते. किशन सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: नाबाद 303 आणि बाकी काहीच नाही! Karun Nair च करियर संपल का?
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।