
Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या वडिलांच्या हस्ते मिळाली.
Emotional moment for Riyan Parag. ❤️
– Riyan received the India debut Cap from his father. pic.twitter.com/kKSQsF0Wbj
— Johns. (@CricCrazyJohns) July 6, 2024
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर तसेच आयपीएल 2024 मध्ये शानदार खेळ दाखवल्यानंतर रियान याला प्रथमच भारतीय संघात जागा बनवण्यात यश आले. या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या दिवशी त्याचे आई-वडील मैदानावर हजर होते. त्याचे वडील पराग दास (Parag Das) हे आसाम संघाचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू असल्याने, रियान याला कॅप देण्याची विनंती संघ व्यवस्थापनाने त्यांना केली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच वडिलांनी आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय कॅप दिल्याची घटना घडली. त्याची आई देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिली आहे. आयपीएल दरम्यान देखील त्याचे आई वडील सातत्याने मैदानावर हजेरी लावत असतात.
व्यतिरिक्त अष्टपैलू अभिषेक शर्मा याने देखील आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर, यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याला टी20 पदार्पणाची संधी मिळाली. शुबमन गिल हा देखील प्रथमच राष्ट्रीय संघाचे नेतृत्व या सामन्यातून करताना दिसला.
(Riyan Parag Received Debute Cap From Fathers Hand)