Breaking News

सांगलीच्या Sachin Khilari ने पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये फडकवला तिरंगा! गोळाफेकीत भारताच्या पारड्यात टाकले रौप्य

sachin khilari
Photo Courtesy; X

Sachin Khilari Won Silver In Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिंपिकमध्ये (Paris Paralympic 2024) मध्ये बुधवारी (4 ऑगस्ट) भारताच्या खात्यात आणखी एक पदक आले. पॅरा गोळाफेकपटू सचिन खिलारी (Sachin Khilari) याने रौप्य पदक मिळवले. स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे.

पुरुषांच्या गोळाफेकमधील F46 प्रकारात सचिन सहभागी झाला होता. या प्रकारातील विश्वविजेता असलेल्या सचिन याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. सचिन याने 16.32 मीटर गोळा फेकला. तर, कॅनडाच्या स्टिवर्ट याने 16.38 मीटर गोळा फेकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. क्रोएशियाच्या बाकोविक याने 16.27 मीटर गोळा फेकत कांस्य पदक जिंकले.

सचिन हा सांगली जिल्ह्यातील करागणी गावचा रहिवासी आहे. शाळेत झालेल्या अपघातामुळे त्याला आपला हात गमवावा लागला होता. त्यानंतर त्याने पॅरा खेळांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक आपल्या नावे केलेले.

(Sachin Khilari Won Silver Medal In Paris Paralympic 2024)

Paris Paralympic 2024: पुरुष बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारच्या नावे गोल्ड, भारताच्या खात्यात 9 वे मेडल