
Rohit Sharma In Test Cricket: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जातोय. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित आपण हा सामना खेळणार नसल्याचे, सांगितले असल्याचे बोलले जाते. मात्र, आता रोहित व निवड समिती (India Selection Committee) यांच्यात रोहितच्या भविष्याविषयी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
Rohit Sharma Test Carrier Over
अखेरच्या कसोटीच्या पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित अखेरच्या कसोटीत खेळणार का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नव्हते. त्यानंतर काही वेळातच रोहितने या कसोटीतून माघार घेतल्याचे सांगितले गेले. त्याच्या जागी सिडनी कसोटीत शुबमन गिल याला संधी दिली. अखेरच्या कसोटीवेळी रोहित भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीसा निराश बसलेला दिसला.
मिळत असलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्यात सिडनी कसोटीपूर्वी चर्चा झाली आहे. आगरकर यांनी रोहित याला संदेश दिला आहे की, यापुढे भारताच्या कसोटी संघासाठी त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच, अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी देखील निवड समिती त्याच्या कसोटी क्रिकेटच्या भवितव्याविषयी बोलणार आहे. त्यामुळे सिडनी कसोटी विराटसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. विराट या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 17 धावांवर बाद झाला आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
कसोटी मालिका सुरू असतानाच भारतीय संघात दरी निर्माण झाल्याच्या बातम्या सुरू आहेत. मालिकेच्या मध्यातच अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने देखील निवृत्ती जाहीर केली. तर, आता रोहित याला देखील बाकावर बसावे लागले. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र न ठरल्यास भारत आपला पुढील कसोटी सामना थेट जून महिन्यात खेळेल.
(Indian Selection Committee Speak With Rohit Sharma On His Test Future)
हे देखील वाचा- 2025 च्या सुरुवातीलाच कॅप्टन्सीसाठी Indian Cricket Team मध्ये राडा? कोण आहे Mr. Fix It? सिनियर्स विरूद्ध ज्युनियर्स वाद…
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।