
Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा अंतिम निर्णय बीसीसीआय (BCCI) घेईल. मिळत असलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात पाठवण्यास इच्छुक नाही. त्याऐवजी भारताचे सामने श्रीलंका अथवा दुबईत आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने ठेवला आहे.
अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय संघ व विराट कोहली यांना ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या इंग्लंडमध्ये एक स्पर्धा खेळत असलेल्या आफ्रिदी याने म्हटले,
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
“मागे घडलेल्या घटना विसरून बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आपला संघ पाठवावा. भारतीय संघाचे तिथे जोरदार स्वागत होईल. भारतीय खेळाडूंना देखील तिथे प्रेम मिळते. विराट कोहली हा पाकिस्तानात आल्यावर त्याची जोरदार खातिरदारी होईल. पाकिस्तानमधील प्रेम पाहून तो भारताचा पाहुणचार विसरून जाईल. विराटला पाकिस्तानात खेळताना पाहायला आम्ही उत्सुक आहोत.”
भारतीय संघ पाकिस्तानात अनेक वर्षांपासून खेळलेला नाही. मागील वर्षी झालेल्या आशिया चषकातील भारताचे सामने देखील श्रीलंकेत आयोजित केले गेले होते. त्यामुळे यंदाही भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
(Shahid Afridi Invite Virat Kohli And Team India In Pakistan)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।